जिल्हाधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान - Marathi News 24taas.com

जिल्हाधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान


www.24taas.com, बीड
 
बीड जिल्ह्यासह राज्यातल्या स्त्रीभ्रूण ह्त्या थांबाव्यात यासाठी राज्य सरकार कसोशीनं प्रयत्न करतंय. मात्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेला छेद देण्याचा जोरदार प्रयत्न चालवलाय.
 
खासगी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याची घोषणा मुख्य़मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केली असताना जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी मात्र ही सेंटर्स बंद करणार नसल्य़ाची ठाम भूमिका जाहीर करत थेट सरकारलाच आव्हान दिलंय.
 
यापूर्वी प्रत्येक गर्भवती स्त्री मागे माणूस ठेवायला मला काय तेवढेच काम आहे का ? अशा शब्दात त्यांनी काही दिवसांपूर्वी मुक्ताफळं उधळली होती. त्यामुळं ते वादात सापडले होते. तसंच माहितीचा अधिकार कर्मचा-यांना डोकेदुखी असल्याचंही त्यांनी सांगायलाही ते विसरले नाही.

First Published: Thursday, June 7, 2012, 12:27


comments powered by Disqus