संत नामदेवांच्या पालखीचे नरसीतून प्रस्थान - Marathi News 24taas.com

संत नामदेवांच्या पालखीचे नरसीतून प्रस्थान

www.24taas.com, हिंगोली
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालखी सोहळा तथा पायीदिंडी आज नामदेवाचे जन्म स्थान असलेल्या नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्याची सांगता ३ जुलै रोजी होणार आहे.
 
नर्सी नामदेव येथील संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालखी सोहळा पायीदिंडी गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने निघत आहे. यावर्षी नर्सी ते श्रीक्षेत्र पंढरपूरदरम्यान जाणारा हा पालखी सोहळा आजपासून सुरु झाला. ९ जून रोजी ही पायीदिंडी हिंगोली येथे तर १० जून रोजी औंढा नागनाथ येथे मुक्कामी येणार आहे.
 
त्यानंतर बाराशीव, हट्टा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथमार्गे ही दिंडी अंबाजोगाई येथे मुक्कामी जाणार आहे. १८ जून रोजी अंबाजोगाई येथे यानिमित्त रिंगण होणार असून २० जूनरोजी सकाळी १० वाजता जऊळबन येथे पालखी सोहळ्याचे गोल रिंगण होणार आहे. त्यानंतर २३ जून रोजी बाश्री येथे गोल रिंगण होणार असून ३ जुलै रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे

First Published: Friday, June 8, 2012, 18:02


comments powered by Disqus