Last Updated: Saturday, June 23, 2012, 13:29
www.24taas.com, हिंगोली हिंगोलीत पोलीस निरीक्षकाच्या गाडीवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड गंभीर जखमी झालेत.
अचानक झालेल्या हल्ल्यात प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन हल्लेखोर ठार झालेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. हट्टा ते जवळा बाजारदरम्यान पोलीस पेट्रोलिंग करत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. यावेळी गाडीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड गाडीत होते. दरोडेखोरांनी कोयता आणि कुऱ्हाडीनं त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर नांदेडच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
First Published: Saturday, June 23, 2012, 13:29