Last Updated: Saturday, July 14, 2012, 18:52
www.24taas.com, उस्मानाबाद 
उस्मानाबादमधून एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर आली आहे. रोड रोमिओच्या छळाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे. काल छेडछाड झाल्यानंतर तीनं जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत मुलगी पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडली होती.
त्यावेळी लखन आढाव या रोड रोमिओनं तिला प्रेमपत्र देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं बदनामीच्या भीतीनं मुलीनं जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात ती ७० टक्के भाजली होती. तिच्यावर उस्मानाबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान आरोपी लखन आढावला याप्रकरणी अटक करण्यात आली.
उस्मानाबादमध्ये एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रोड रोमियोच्या छेडछाडीला घाबरुन, कंटाळून तीने हा प्रकार केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
First Published: Saturday, July 14, 2012, 18:52