पोलीस घेतायेत आरोपी उंदराचा शोध... - Marathi News 24taas.com

पोलीस घेतायेत आरोपी उंदराचा शोध...

झी २४ तास वेब टीम, लातूर
 
लातूरच्या सरकारी रुग्णालयात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूरच्या सरकारी  हॉस्पिटलमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. एका उंदराने ५० वर्षीय महिलेच्या डाव्या हाताची तीन बोटे, तर उजव्या हाताची दोन बोटे खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री झोपेत असताना उंदारांनी बोटे खाल्ल्याचं लक्षात येताच ती महिला घाबरून गेली, त्यातचं त्या महिलेला हार्टअटॅक आला आणि  महिलेचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला.
 
शारदा उत्तम होदाडे असं या महिलेचं नाव आहे. शारदा त्यांच्या मुलीला डिलेव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या होत्या. त्यांची मुलगी तिच्या नवजात बाळासह कॉटवर झोपलेली होती. तर शारदाबाई खाली जमिनीवर झोपल्या होत्या. हॉस्पिटलच्या या गैरसोयीबद्दल मृत महिलेच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
 
विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या डीनने आम्ही आता उंदीर शोधमोहीम सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. तर पोलिसांनी या सगळ्या प्रकाराबद्दल हॉस्पिटलमधील दोषींवर कारवाई करण्याऐवजी उंदरांना दोषी ठरवत हात झटकले आहे.

First Published: Thursday, December 22, 2011, 07:50


comments powered by Disqus