अजित पवारांचा सवाल, बंदूक तरी उचलता येते का? - Marathi News 24taas.com

अजित पवारांचा सवाल, बंदूक तरी उचलता येते का?

झी 24 तास वेब टीम, हिंगोली 
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावरुन सुरू झालेला ठाकरे विरुद्ध पवार हा वाद, संपता संपत नाहीए.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा बाळासाहेबांना ‘टार्गेट’ केलं आहे त्यामुळे हा वाद ‘टारगट’ पातळीवर उतरल्याचे दिसून येते. तर उद्धव यांनी पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
 

मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही वेगळी करणार नाही शिवसेनेचं हे नेहमीचं भावनिक राजकारण असल्याची टीका पवार यांनी केली आहे. तसंच यासाठी बंदुकीची भाषा करणा-यांना बंदुक तरी उचलता येते का? असा टोलादेखील अजित पवार यांनी हाणला आहे. त्याचप्रमाणे आम्हाला देखील ‘भ’ भाषा येते, आम्ही ती सुरू केली तरी गडबडून जाल. अशी दर्पोक्तीच अजित पवार यांनी केली आहे.
 
उपमुख्यमंत्र्यांच्या टीकेनं संतापलेल्या उद्धव ठाकरे  यांनी  आपल्या नेहमीच्याच शैलीत अजित पवारांवर टीका केली आहे, ‘अजित पवार हा फडतूस माणूस आहे’ असं वादग्रस्त विधान केलं आहे.  अशा या वादाला शिवसेनाप्रमुखांचं दसरा मेळाव्यातलं भाषण असलं तरी आगामी स्थानिका स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळं येत्या काही दिवसात हे आरोप प्रर्त्यारोपाचं सत्र आणखी रंगण्याची शक्यता आहे.
 

First Published: Sunday, October 9, 2011, 10:36


comments powered by Disqus