दलित समाजाला बंदुकीची परवानगी ? - Marathi News 24taas.com

दलित समाजाला बंदुकीची परवानगी ?

www.24taas.com, बीड
 
ग्रामीण भागातल्या दलित समाजाला स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवानगी मिळाले पाहिजे अशी मागणी  रिपाइं नेता रामदास आठवले यांनी केली आहे.
 
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या चिंचोली इथं पाच हजार रुपयांसाठी सहदेव तायदे या ऊसतोड मजुराला मुकादमाने जिवंत जाळलं होतं. यांत त्या मजुराचा मृत्यू झाला होता. या ऊसतोड कामगाराच्या कुटुंबियांची आठवले यांनी भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले यांनी दलितांच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर तोफ डागली. देशात दलितांवरील सर्वाधिक हल्ले महाराष्ट्रात होत आहेत.
 
हे हल्ले रोखण्यात सरकार अपयशी ठरलं असून राज्यात दलित समाज सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळं ग्रामीण भागातल्या दलित समाजाला बंदुकीचा परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

First Published: Monday, January 16, 2012, 09:25


comments powered by Disqus