Last Updated: Sunday, February 5, 2012, 13:08
www.24taas.com, उस्मानाबाद 
उस्मानाबाद बस स्थानकाजवळ एक जिवंत अर्भक सापडलं आहे. गटाराच्या जवळ कपड्यात गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत हे अर्भक सापडलं. काही प्रवाशांनारात्री बाराच्या सुमारास याठिकाणी बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी याविषयीची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी हे अर्भक ताब्यत घेतलं.
या अर्भकाला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनैतिक संबंधातून किंवा मुलगी झाल्याच्या कारणावरून हा अमानुष प्रकार घडला असण्याची शक्यता आहे.
First Published: Sunday, February 5, 2012, 13:08