Last Updated: Friday, February 10, 2012, 11:24
विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहिम अगदी जोरात सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणा-या इमारती जमीनदोस्त केल्या जाताहेत मात्र नवे रस्ते बांधण्यासाठी पालिकेकडे पैसाच नाही. यावर आयुक्तांनी यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी एका महिन्याचा पगार देण्याचं आवाहन केलं आहे तर कर्मचारी संघटनांनी याचा विरोध केला आहे.
औरंगाबाद शहरात रस्तारुंदीकरणासाठी वाटेत येणाऱ्या इमारती हटवण्याची जोरदार मोहीम पालिका आयुक्त पुरुषोत्तम भापकरांनी होती घेतली, त्यांच्या या धडक मोहिमेचं कौतुकही झालं मात्र रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेकडे पैसाच नाही हेही तितकंच खरं आहे. रुंदीकरणासाठीच्या निधीची मागणी राज्य सरकारक़डे प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांनी शहराच्या विकासाठी पुढे यावं, तसंच पालिका कर्मचऱ्यांनी आपला एका महिन्याचा पगार द्यावा असं आवाहन केलं, मात्र कर्मचारी संघटनांनी याला जोरदार विरोध केला. तर सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी याला तुघलकी निर्णय म्हटलं आहे.
आयुक्तांनी कर्मचारी संघटनांच्या भूमिकेवर टीका केली. तर चिमुकल्यांपासून ते सुजाण नागरिकांपर्यंत सर्वांनीच मात्र आयुक्तांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिक शहराच्या विकासासाठी पुढे येत असताना कर्मचाऱ्यांची आडमुठी भूमिका टीकेचं लक्ष्य होत आहे.
First Published: Friday, February 10, 2012, 11:24