पंचगंगेत मैला, कोल्हापूर पालिका आयुक्तांनाच कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:47

पंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.

मुंबई पालिकेचा सोमवारी अर्थसंकल्प

Last Updated: Sunday, February 3, 2013, 19:28

मुंबई महानगरपालिकेचा २०१३-१४ अर्थसंकल्प पालिका आयुक्त सीताराम कुंटे स्थायी समितीत उद्या सादर करणार आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांची बदली

Last Updated: Saturday, February 11, 2012, 11:04

ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिक महापालिका आयुक्त बी.डी.सानप यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी पी.वेलरासू यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

रस्ता रुंदीकरणाचा निर्णय 'तुघलकी' !

Last Updated: Friday, February 10, 2012, 11:24

औरंगाबामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहिम अगदी जोरात सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणा-या इमारती जमीनदोस्त केल्या जाताहेत मात्र नवे रस्ते बांधण्यासाठी पालिकेकडे पैसाच नाही.

औरंगाबाद : आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये वाद

Last Updated: Friday, January 13, 2012, 20:12

औरंगाबादेत महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आयुक्त अकार्यक्षम असल्याचा आरोप करत, काही नगरसेवकांनी आयुक्तानांच हटवण्याची मागणी केली आहे.

कल्याण पालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा

Last Updated: Thursday, December 22, 2011, 21:00

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनावणे जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी एका कर्मचाऱ्याचे सामान घरातून बाहेर फेकल्याचे आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय.