Last Updated: Wednesday, February 22, 2012, 13:09
www.24taas.com, औरंगाबाद 
औरंगाबाद जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेत कॉपीप्रकरणी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. २२ पैकी १७ विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात २ पर्यवेक्षक आणि एका केंद्र प्रमुखांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेले सर्व विद्यार्थी कन्नड आणि फुलंब्री तालुक्यातील आहेत.
१२ वीची परीक्षा राज्यभरात सुरु होताच लगेचच कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातल्या ५ हजार ८२८ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे. १३ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेला बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये सायन्स शाखेचे ४ लाख २२ हजार, कॉमर्सचे ३ लाख ४८ हजार आणि आर्ट्सचे ५ लाख पंधरा हजार विद्यार्थी आहेत.
व्यवसाय अभ्यासक्रमाचे ५९ हजार विद्यार्थी आहेत. कॉपी रोखण्यात शिक्षण विभाग नेहमीच अयशस्वी होतं त्यामुळे यंदा कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील मदत घेण्यात आली आहे.
First Published: Wednesday, February 22, 2012, 13:09