राज्यात १२ वीच्या परीक्षांवर शिक्षकांचा बहिष्कार

Last Updated: Sunday, February 2, 2014, 23:41

यंदा बारावीच्या परीक्षा सुरळीत होणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार आहे. कारण ज्यू. कॉलेजच्या शिक्षकांनी १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला असून उद्यापासून राज्यातील ६० हजार शिक्षक परीक्षेचं कोणतही कामकाज करणार नाहीयेत. दरम्यान, ६ फेब्रुवारीपासून १२वीची प्रात्यक्षिकांची परीक्षा सुरु होणार प्राध्यापकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची भूमिका घेतली आहे.

बारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:30

बारावीच्या परिक्षांवेळी रात्रीचं लोडशेडींग केलं जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. मात्र काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या या घोषणेचे तीनतेरा वाजलेत.

मनसे शहराध्यक्षांची `नापासांची शाळा` नापास

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:41

मनसे शहराध्यधामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं आहे. पंढरपुरात मनसे शहर अध्यक्षाच्या बनवाबनवीचा फटका बारावीच्या ५० विद्यार्थ्यांना बसला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट ऑफ लक’!

Last Updated: Thursday, February 21, 2013, 09:23

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होतेय. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे.

दहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक

Last Updated: Monday, July 2, 2012, 21:27

बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.

२२ कॉपीबहाद्दरांवर फौजदारी गुन्हे दाखल

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 13:09

औरंगाबाद जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेत कॉपीप्रकरणी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. २२ पैकी १७ विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आज १२ वीची परीक्षा, प्रत्येक पेपरआधी सुट्टी

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 10:29

विद्यार्थ्यांच्या करियरची दिशा निश्चित करणारी १२ वीची परीक्षा आजपासून राज्यभरात सुरु होते आहे. राज्यभरातल्या ५ हजार ८२८ परीक्षा केंद्रावर ती घेतली जाणार आहे.