खड्ड्यात पडलेल्या रेहानचा 'लढा सुरूच' - Marathi News 24taas.com

खड्ड्यात पडलेल्या रेहानचा 'लढा सुरूच'

www.24taas.com, उस्मानाबाद
 
उस्मानाबादमध्ये उमरगा तालुक्यातील कोथळी गावात ३ वर्षांचा रेहान बेग हा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची दुर्दैवी घटना काल संध्याकाळी घडली. आपल्या शेतमजूरी करणऱ्या आईबरोबर तो बसवराज मायाचारी यांच्या शेतावर गेला होता.
 
संध्याकाळी ५ च्या सुमारास खेळता खेळता रेहान  बंद पडलेल्या बोअरवेलमध्ये पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांबरोबर प्रशासनही युद्ध पातळीवर काम करत होतं. त्याला तिथपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचा प्रयत्न स्थानिक डॉक्टर करत होते. चिमुकल्या रेहानचा जीव वाचवण्याचं काम रात्रभर चालू होतं. त्या बोअरवेलचं तोंड उघडं राहिल्यामुळे रोहनचा अपघात झाला.
 
पण गेली १६ तास झाले तरीही बोअरवेल मध्ये पडलेला, रेहानला बाहेर काढता येत नाहीये, प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र अजूनही त्याला बाहेर काढण्यात अजिबात यश आलेलं नाही. त्यामुळे रेहान गेली १६ तास बाहेर पडण्यासाठी धडपडतो आहे.
 
 
 
 

First Published: Friday, March 2, 2012, 09:16


comments powered by Disqus