Last Updated: Wednesday, March 7, 2012, 15:31
www.24taas.com, उस्मानाबाद वाळूमाफियानंतर आता वीट माफियांची दहशत निर्माण झाली आहे. गौण खनिजाची रॉयल्टी मागण्यास गेलेल्या उस्मानाबादच्या तहसिलदारांना वीटभट्टी चालकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
तहसिलदार अभिजीत पाटील यांना शेकापूर गावातल्या वीटभट्टी चालकांनी आठ दिवसांपूर्वी धमकी दिली होती. या घटनेनंतरही धमकी देणाऱ्या वीटभट्टी चालकांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.
त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातल्या महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्यामुळे वाळूमाफियानंतर वीटभट्टी चालकांची मुजोरी वाढल्याचं दिसून येतंय.
First Published: Wednesday, March 7, 2012, 15:31