Last Updated: Wednesday, March 28, 2012, 11:23
www.24taas.com, औरंगाबाद 
औरंगाबादमध्ये मनसेतील वाद विकोपाला गेला आहे. मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसे शहराध्यक्षांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दिलीप बनकरांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर हर्षवर्धन जाधव आणि मनसेत दुरावा निर्माण झाला आहे.
औरंगाबादमधील मनसेतला हा वाद आमदार हर्षवर्धन जाधव आणि मनसे शहराध्यक्षांच्यात झाला. त्यामुळे हा वाद अगदीच विकोपाला गेला आहे, त्यामुळे ह्या वादाने पोलीस स्टेशन गाठलं आहे. जाधवांनी दिलीप बनकरांविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. दिलीप बनकरांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
असं म्हणत आमदार जाधवांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे औरंगाबादमघ्ये मनसेत दुफळी निर्माण झाली आहे. झी २४ तासने शहराध्याधांशी संपर्क साधला असता, त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाबाबत हात वर केले आहेत. तक्रारारीबाबत त्यांना कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले आहे.
First Published: Wednesday, March 28, 2012, 11:23