हर्षवर्धन राजीनामा देऊ नका, अजितदादांनी घातली गळ

Last Updated: Thursday, January 10, 2013, 13:28

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनामा नाट्यानं आणखी एक वळण घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन जाधवांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलाय

मनसे पक्षप्रमुख पैसे घेऊन तिकीट देतात - हर्षवर्धन

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 12:45

मनसेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.

मनसे आमदाराचा पालकमंत्र्यांवर मनमानीचा आरोप

Last Updated: Monday, October 8, 2012, 22:31

औरंगाबादमध्ये जिल्हा नियोजन समितीने 2012-13 या वर्षाच्या योजनेत 66 कोटी रुपयांच्या कामांना नियमबाह्य मान्यता दिल्याचा आरोप मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी मनमानी करत निधीचे वाटप करीत असल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय. याविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

मनसे आमदाराला मारहाण, पोलिसांना झटका

Last Updated: Monday, September 10, 2012, 15:32

मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांचा अहवाल खुलताबाद कोर्टाने फेटाळून लावलाय. याप्रकरणी हायकोर्टात पिटीशन दाखल करणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलंय. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जावा अशी मागणीही करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मनसेत वाद, आमदाराला मारण्याची धमकी

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 11:23

औरंगाबादमध्ये मनसेतील वाद विकोपाला गेला आहे. मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसे शहराध्यक्षांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दिलीप बनकरांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

आमदार जाधवांचा मनसेला रामराम ?

Last Updated: Friday, March 23, 2012, 12:47

औरंगाबाद जिल्ह्यात मनसेत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. विश्वासात न घेता जिल्हा परिषेत आघाडीला पाठिंबा दिल्यानं आमदार हर्षवर्धन जाधव नाराज आहेत. जाधव हे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा आहे.