Last Updated: Thursday, April 5, 2012, 13:05
www.24taas.com, लातूर 
लातूर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना विलासराव देशमुख यांचे पूत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चानं केला आहे.
लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात देशमुख यांनी प्रचाराला सुरूवात केली. मात्र, प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापर करता येत नसल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे.
आणि त्यासाठी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजयुमोनं केली आहे. देवाचे दर्शन घेणे हा गुन्हा नसल्याचे सांगत आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा खुलासा देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे आर्दश प्रकरणी विलासराव चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.
First Published: Thursday, April 5, 2012, 13:05