प्रचारात राज्यपाल, आचारसंहितेचा भंग?

Last Updated: Monday, April 9, 2012, 15:20

लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं राज्यपाल असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा फोटो प्रचारासाठीच्या पोस्टरवर वापरला आहे. आचारसंहितेचा भंग केला असल्यानं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे.

देशमुखांनी केली आचारसंहिता भंग?

Last Updated: Thursday, April 5, 2012, 13:05

लातूर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना विलासराव देशमुख यांचे पूत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चानं केला आहे.

राहुल गांधींविरूद्ध गुन्हा दाखल

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 08:05

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याविरोधात प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. यामुळे कानपूरमधील त्यांचा रोड शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

माणिकराव ठाकरेंवर गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, February 9, 2012, 19:57

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

आचारसंहिता भंग : अजित पवार अडचणीत

Last Updated: Friday, January 6, 2012, 13:43

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवार यांच्याकडे राज्य निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. पुण्यात विकासकामांच्या भूमिपूजनचा कार्यक्रम केला होता.