बलात्कारामुळे १२ वर्षाची मुलगी कुमारी माता - Marathi News 24taas.com

बलात्कारामुळे १२ वर्षाची मुलगी कुमारी माता

www.24taas.com, उस्मानाबाद
 
उस्मानाबादमध्ये माणूसकिला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. उस्मानाबादमध्ये १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. आणि त्यामुळे पीडित मुलगी ही माता झाली आहे. बलात्कारामुळे कुमारी माता बनलेल्या एका १२ वर्षीय पीडित मुलीची तक्रार पोलिसांनी अद्यापही नोंदवून घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहरा इथं घडला आहे.
 
गंभीर बाब म्हणजे आता तिनं जन्म दिलेलं बाळही गायब झालं आहे. लोहारा तालुक्यातील सास्तूर गावच्या समीर इस्माईल खापरे या नराधमानं हे कृत्य केलं आहे. १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही त्यानं दिली आहे. पोलिसांकडे पीडित मुलगी आणि तिचं कुटुंब तक्रार द्यायला गेलं असताना लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजीझ अनदुरकर यांनी फिर्याद दाखल करुन घेतली नाही.
 
तसंच आरोपीला वाचवण्यासाठी पीडित कुटुंबाला दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत पिटाळून लावलं. त्यामुळं या पोलीस निरीक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येतं आहे. तसंच त्या गायब करण्यात आलेल्या लहान मुलाचा शोध घेण्याचीही जबाबदारी पोलिसांना उचलावी लागणार आहे.
 

First Published: Thursday, April 12, 2012, 18:13


comments powered by Disqus