नांदेडमध्ये शिवसैनिकांमध्ये राडा - Marathi News 24taas.com

नांदेडमध्ये शिवसैनिकांमध्ये राडा

www.24taas.com, नांदेड
 
नांदेडच्या राडेबाज शिवसेना पदाधिका-यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. नांदेड  शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील आणि नांदेड शहरप्रमुख निखिल लातूरकर यांनी पदांचा राजीनामा दिलाय.
 
नांदेडमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत राडा झालाय. शहप्रमुख निखील लातूरकर यांच्या घराची तोडफोड केली असून यात जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत. यात एका पोलिसाचाही समावेश आहे.
 
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादातून हा राडा झाल्याचं बोललं जातंय.

First Published: Monday, April 23, 2012, 19:09


comments powered by Disqus