Last Updated: Friday, November 25, 2011, 08:38
झी २४ तास वेब टीम, बुलढाणा बुलढाण्यात २७ नोव्हेंबरला सोयाबीन आणि कापूस परिषद होणारच असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत या परिषदेला परवानगी नाकारली आहे.
पोलिसांची परवानगी नसली तरी कोणत्याही परिस्थितीत कापूस परिषद होणार असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्याक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय़. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे नेते रविकांत तुपकर यांच्याविरोधातील गुन्ह्यांमुळं परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
पोलिसांनी परवानगी नाकारण्याची दिलेली कारणं तकलादू असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.
First Published: Friday, November 25, 2011, 08:38