निर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 09:24

राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...

बारामतीत आगडोंब, आगीचं शुक्लकाष्ठ सुरूच

Last Updated: Friday, June 22, 2012, 17:47

बारामतीमध्ये एमआयडीसीत असलेल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीत आग लागली आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ही आग लागली असल्याचे वृत्त काही वेळापूर्वीच हाती आले आहे. त्यामध्ये कापसाच्या पाच हजार गाठी जळून खाक झाल्या आहेत.

कापूस निर्यातीवरील बंदी मागे

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 09:46

केंद्र सरकारने कापूस निर्यातीवर घातलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय कॅबिनेटच बैठकीत घेतला. त्यामुळे यंदा कापसाची विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. आता आणखी २० लाख गाठींची निर्यात करण्यात येणार आहे.

.. अन् कापसावरील निर्यातबंदी उठली!!!

Last Updated: Sunday, March 11, 2012, 18:58

कापसावरची निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. निर्यात बंदी उठवण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कालच केले होते. निर्यातबंदी उठवल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:57

केंद्राने कापूस निर्यातीवर बंदी घातल्यानं त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

कापूस शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानं

Last Updated: Saturday, December 24, 2011, 08:45

सरकारने कापूस उत्पादकांना सरकारची मदत जाहीर. धान आणि सोयाबीनला प्रति हेक्टरी दोन हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर चार हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली आहे. २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.

कापसाच्या प्रश्नावरून अधिवेशनात रणकंद

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 10:17

पहिल्या दिवसाप्रमाणं आज दुस-या दिवशीही नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही कापसाच्या मुद्यावर गाजतोय. आमदार पाशा पटेलांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:37

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.

राणेंचा उद्धव ठाकरेंचा टोला

Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:15

निवडणुका आल्यानंतरच उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची आठवण येते असा सणसणीत टोला नारायण राणेंनी लगावलाय. कापूस प्रश्नावर शिवसेना शेतकऱ्याची दिशाभूल करतेय, उद्धव ठाकरे य़ांनी आधी शेतीचा अभ्यास करावा आणि मगच बोलावे अशी टीका नारायण राणेंनी औरंगाबादेत केलीय.

कापूस पट्ट्यात बंदचा उद्धव ठाकरेंचा इशारा

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 18:11

कापसाला सहा हजार रुपये हमी भाव दिला नाही तर येत्या 15 डिसेंबरला कापूस उत्पादक पट्ट्यात बंद पाळण्याचा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिला.

जऴगावमध्ये कापूस शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 05:08

कापसाला 6000 रूपये हमीभाव मिळावा यासाठी राज्यात आंदोलन पेटलेले असताना जऴगाव जिल्हात आणखी एका कापूस शेतकऱ्याने आत्महत्या केली.

कापूस प्रश्नी भाजपाचा सरकारला इशारा

Last Updated: Sunday, November 27, 2011, 11:14

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

भाजपाचे आ.गिरीश महाजन यांनी उपोषण सोडलं

Last Updated: Saturday, November 26, 2011, 11:31

जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घेतलं आहे. कापूस दरवाढीच्या मागणीसाठी गेले 10 दिवस त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सोडले असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

मुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र

Last Updated: Saturday, November 26, 2011, 09:10

"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

भाजपाचे आ. गिरीश महाजन यांची प्रकृती चिंताजनक

Last Updated: Friday, November 25, 2011, 12:12

जळगावात गेल्या नऊ दिवसांपासून कापूस दरवाढीसाठी उपोषणास बसलेल्या आमदार गिरीश महाजन यांची प्रकृती आणखी खालावली. महाजन यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

शेतकरी विधवाही कापूस आंदोलनात

Last Updated: Friday, November 25, 2011, 10:11

यवतमाळच्या केळापूरमध्ये विदर्भातल्या शेतकरी विधवा रस्त्यावर उतरल्या होत्या. राहुल गांधींनी भेट घेतलेल्या कलावती आणि केबीसीतील विजेत्या अपर्णा मालेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधवांनी रस्त्यावर उतरत कापूस दरवाढीच्या प्रश्नाचा निषेध केला.

कापूस दरवाढीविरोधात 'थाळीनाद' आंदोलन

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 10:59

कापूस हमीभावाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. महाजन यांच्या उपोषण स्थळापासून देवकर यांच्या निवासस्थानापर्यंत महिलांनी मोर्चा काढला आणि थाळीनाद आंदोलन केलं.

कापूस दरवाढीवर अजून तोडगा नाहीच!

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 10:46

कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे.

कापूस आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हं

Last Updated: Monday, November 21, 2011, 07:30

जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही.

कापूस प्रश्नावर २३ला सर्वपक्षीय बैठक

Last Updated: Sunday, November 20, 2011, 09:48

कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मध्यस्तीनंतर आपले उपोषण मागे घेतले.

राणांची प्रकृती ढासळली, सरकारची धावपळ

Last Updated: Sunday, November 20, 2011, 10:02

कापसाच्या प्रश्नावर उपोषण करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने सरकारची धावपळ सुरू झाली आहे.

आमदार रवी राणांची प्रकृती खालावली

Last Updated: Sunday, November 20, 2011, 05:29

अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

कापूस आंदोलनाला हिंसक वळण

Last Updated: Saturday, November 19, 2011, 09:44

जळगाव जिल्ह्यात कापूस दरवाढीच्या आंदोलनाने चांगलाच वेग घेतला आहे. जळगाव औरंगाबाद महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केला. तर जामनेर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ४ बसेसची तोडपोड केली.

आमदार रवी राणांना आता सोबत पत्नीची

Last Updated: Friday, November 18, 2011, 08:31

कापूस दरवाढीसाठी अमरावतीतले आमदार रवी राणा यांनी जेलमध्ये उपोषण सुरू केले असताना त्यांच्या पत्नी अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी जेलबाहेर उपोषण सुरु केलं.

कापूस आंदोलनात भाजपाची उडी

Last Updated: Thursday, November 17, 2011, 06:58

राज्यात कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता त्याच्यावरुन राजकारणही सुरु झालंय. शिवसेनेपाठोपाठ भाजपानंही या आंदोलनात उतरण्याचा इशारा सरकारला दिलाय.

कापूस उत्पादक शेतक-याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 03:12

जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.

कापूस आंदोलन पेटलं, एसटी टार्गेट

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 02:50

कापूस दरवाढीसाठी आंदोलनाची धग कायम आहे. विदर्भात हे आंदोलन चांगलचं पेटलय. संतप्त आंदोलकांनी एसटीला टार्गेट केलं आहे.

पांढऱ्या सोन्याची झोळी खाली

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 06:29

विदर्भातील एकही नेता कापसाच्या हमीभावासाठी शेतक-यांची बाजू घेत आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार नाही. त्यामुळे कापूस उप्तादक शेतकरी पुरते हवालदिल झालेत.

कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय

Last Updated: Monday, November 14, 2011, 07:42

ऊस दरवाढीनंतर आता कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय.

शेतकऱ्यांची 'कापूस'कोंडी

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 15:34

नव्या कापसाला भाव मिळणार नसल्याची शक्यता असल्यानं स्वतंत्र भारत पक्षाने राज्यात पीक परिषदांचं आयोजन केलं आहे. कापूस आणि धानच्या निर्यातीच्या फसव्या धोरणामुळे शेतक-यांची कोंडी होत असल्यामुळे पीक परिषदांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.