कापूस प्रश्नी भाजपाचा सरकारला इशारा - Marathi News 24taas.com

कापूस प्रश्नी भाजपाचा सरकारला इशारा

झी 24 तास वेब टीम, जळगाव

 
कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.


जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घेतलंय. कापूस दरवाढीच्या मागणीसाठी गेले 10 दिवस त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सोडले असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला असून जिल्ह्यातल्या रस्त्यावरुन एकही वाहन फिरकू देणार नसल्याचं ते म्हणाले. महाजनांची प्रकृती खालावल्याने काल त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घेतलंय.
 


महाजनांनी उपोषण सोडले असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला असून जिल्ह्यातल्या रस्त्यावरुन एकही वाहन फिरकू देणार नसल्याचं ते म्हणाले. महाजनांची प्रकृती खालावल्याने काल त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
 
उपोषण सोडण्याबाबत मुनगंटीवारांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, सरकारने कापसाला योग्य हमीभाव दिला नाही, तर नागपुरात लाल दिव्याच्या गाड्या फिरकू देणार नाही, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिलाय.

First Published: Sunday, November 27, 2011, 11:14


comments powered by Disqus