मनु सिंघवींना फासावर लटकवा - अण्णा - Marathi News 24taas.com

मनु सिंघवींना फासावर लटकवा - अण्णा

www.24taas.com, बीड
 
 
महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या  काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना फासावर लटकवण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. ते बीडमध्ये बोलत होते.
 
 
संसदेचं स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवणा-या अभिषेक मनु सिंघवी यांच्यासारख्या माणसानं एका महिलेशी अश्लील चाळे करणं योग्य़ नाही. त्यामुळं या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास त्यांना फासावर लटकवण्यात यावं, अशी मागणी अण्णांनी केली.
 
 
मोठ्या पदावर असणा-या नेत्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे असंही अण्णांनी म्हटलंय. शिवाय सिंघवी यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सक्षम लोकायुक्ताच्या मागणीसाठी अण्णांनी राज्याचा दौरा सुरु केलाय. अण्णा  उस्मानाबादमध्ये दौऱ्यावर आहेत.
 
 
अण्णांना रामदास आठवलेंला पाठिंबा
टीम अण्णांकडून संसदेवर होणारी टीका चुकीची आहे. त्यामुळं अण्णा हजारे बदनाम होत असल्याची प्रतिक्रिया रिपाइं नेता रामदास आठवले यांनी दिलीय. 2014 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यासाठी आठवलेंनी 4 ते 5 जागांची मागणी केलीय. यांत शिवसेनेनं प्रतिष्ठेची केलेल्या रामटेक लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. रामटेकमध्ये आपण स्वतः निवडणूक लढवणार नसलो तरी ती जागा रिपाइंला मिळावी अशी मागणी त्यांनी गडकरींकडे केलीय.

First Published: Saturday, May 5, 2012, 08:59


comments powered by Disqus