Last Updated: Monday, September 24, 2012, 08:00
अण्णांपासून दूरावलेल्या अरविंद केजरीवाल यांनी अण्णा आणि आपण लवकरच पुन्हा एकत्र येऊ, असा आशावाद व्यक्त केलाय. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांना अण्णांनी त्यांचा फोटो किंवा नाव वापरण्याला बंदी घातली आहे. दोघांमधले संबंध टोकाचे दुरावलेत. मात्र, तरीही अण्णा आणि आपण येत्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकत्र येऊ, असा आशावाद केजरीवाल यांना वाटतोय.