एकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ Torture to girl

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ
www.24taas.com, आंबेजोगाई

एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं अपहरण करुन 19 दिवस तिचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेजोगाईत उघडकीस आलं आहे.

25 फेब्रुवारीला या तरुणीच्या वाढदिवसाच्या दिवशी, पार्टीसाठी गेलेल्या या तरुणीचं अपहरण करण्यात आलं. शहरातील गोकुळ रेस्टॉरंट येथून गाडीत घालून तिचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिला लातूरहून पुण्याला नेण्यात आलं. त्यानंतर या मुलीला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि त्यानंतर राजस्थानात तिकमगड येथे नेण्यात आलं होतं. या काळात तिचा खूप छळही करण्यात आला. या मुलीला प्रचंड मारहाण करण्यात आली, त्याचबरोबर तिचे केस कापण्यात आले तसचं तिचा सिगरेटचे चटकेही देण्यात आले. राहुल बडे या तरुणानं एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार केलाय.

ठरलेलं लग्न मोडून टाक, अन्यथा तिच्या भावी नव-याला आणि वडिलांना मारुन टाकण्याची धमक्याही या काळात तिला देण्यात आल्या. 19 दिवासंनंतर या मुलीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलय. आरोपी राहुल बडेसह सहा जणांनी अपहरण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. राहुल बडे सह सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.

First Published: Monday, March 18, 2013, 22:20


comments powered by Disqus