Last Updated: Thursday, November 28, 2013, 18:00
www.24taas.com, झी मीडिया, बीड बीडचे लोकप्रिय जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अखेर बदली करण्यात आलीय. बीडकरांनी या निर्णयाला बदलीला विरोध करत केंद्रेकरांची बदली रोखून धरली होती.
परंतु, बीडकरांच्या विरोधाला डावलत केंद्रेकर यांची औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून बदली करण्यात आलीय. आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे केंद्रेकर हे बीडकरांमध्ये लोकप्रिय झाले होते. केंद्रेकर यांची बदली होऊ नये, अशी बीडकरांनी मागणी केली होती. त्यामुळे ‘…आता ही बदली रोखावी’ अशी मागणी करत नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. या निर्णयाविरोधात बीडच्या नागरिकांनी बीड बंदचं आवाहन केलंय.
दरम्यान, केंद्रेकर यांच्या बदलीनंतर बीडच्या जिल्हाधिकारी पदावर नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आलीय. लवकरच ते पदभार स्वीकारतील.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 28, 2013, 18:00