नोकरीची संधी : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 07:21

ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात लिपिक आणि टंकलेखक 76 जागा आणि निम्नश्रेणी लघुलेखक 9 जागा अशी एकूण 85 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2014 आहे.

पंढरपुरातील शौचालयाचा अहवाल सादर करा - मुंबई उच्च न्यायालय

Last Updated: Friday, May 9, 2014, 17:31

पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शौचालय उभारण्याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहेत. हा अहवाल पंढरपूर जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी, एमएसआरडीसी, पंढरपूर नगरपालिका आणि सेंट्रल रेल्वे यांनी एक बैठक घेऊन द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

Last Updated: Thursday, April 17, 2014, 21:58

पुण्यात शेकडो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आहे. कौन्सिल हॉल समोर शेकडो लोकांनी अंधार पडला असला तरी गर्दी केली आहे.

मुंबईवर दहशवादी हल्ला होण्याचा धोका

Last Updated: Friday, March 21, 2014, 19:40

मुंबईला दहशवादी पुन्हा एकदा टार्गेट करू शकतात. तसा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. एखादी हवाई सफर करावयाची असेल तर पोलिसांनी परवानगी घेण्याची आवश्यता आहे. तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात नंदूरबार बंद

Last Updated: Saturday, February 8, 2014, 22:45

नंदूरबारचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात येतोय. विशेष म्हणजे सर्वसामान्य छोट्या विक्रेत्यांपासून मोठया व्यापा-यांपर्यंत सगळ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग घेतलाय.

अखेर सुनील केंद्रेंच्या बदलीवर शिक्कामोर्तब!

Last Updated: Thursday, November 28, 2013, 18:00

बीडचे लोकप्रिय जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अखेर बदली करण्यात आलीय. बीडकरांनी या निर्णयाला बदलीला विरोध करत केंद्रेकरांची बदली रोखून धरली होती.

राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकले?

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 14:12

बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अवघ्या ८ महिन्यांत तडकाफडकी बदली करण्यात आली. नेदरलँडला ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर केंद्रेकरांना पुन्हा रुजू न होण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

प्रतिभा पाटील, विलासराव यांचे भूखंड वादात

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 17:22

बड्या राजकीय नेत्यांच्या संस्थांना दिलेले भूखंड परत का घेण्यात येऊ नयेत, असा सवाल पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी या संस्थाना पाठवलेल्या नोटिसांमध्ये विचारला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, जयंत पाटील यांच्याशी संबंधित या संस्था आहेत.

सीताराम कुंटे मुंबईचे नवे आयुक्त

Last Updated: Monday, April 30, 2012, 17:59

सीताराम कुंटे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. ते सध्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत. सुबोधकुमार यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडून कुंटे सुत्रे घेतील.

मुंबईचे आयुक्त जाणार, आता कोण येणार?

Last Updated: Monday, April 30, 2012, 16:14

मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार आज निवृत्त होत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच, त्यांनी सुबोधकुमार यांच्या नावाचा आग्रह धरत मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली होती.

ओडिशातील अपहृत आमदाराची सुटका?

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 12:41

बिजू जनता दलाचे आमदार जिन्हा हिकाका यांची गुरूवारी सुटका करण्याचा निर्णय माओवाद्यांनी घेतला आहे. हिकाका यांना उद्या सकाळी दहा वाजता कोरपूट जिल्ह्यातील बलीपेटा गावात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अपहृत कलेक्टरांची सुटका होणार?

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 16:01

छत्तीसगडमधील सुकमाचे कलेक्टर अलेक्स मेनन यांची अद्याप सुटका झालेली नाही. त्यांच्या मध्यस्थीसाठी नक्षलवाद्यांनी सुचवलेल्या तीन नावांपैकी दोघांनी मध्यस्थीस नकार दिल्यानं छत्तीसगड सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयातून संगणकांची चोरी

Last Updated: Monday, February 27, 2012, 22:51

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून सात संगणक चोरीला गेलेत. विशेष म्हणजे नाशिकमधलं बोगस व्होटिंग कार्डांचं प्रकरण उघड होताच हे संगणक चोरीला गेलेत. त्यामुळे बोगस व्होटिंग कार्ड घोटाळा सरकारी आशीर्वादानंच झाला की काय, याचा संशय बळावलाय.