Last Updated: Monday, October 28, 2013, 14:32
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादऔरंगाबादमध्ये मछली खडक भागात संतप्त नागरिकांनी दारु अड्डा उद्ध्वस्थ केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मछली खडक भागात हे देशी दारूचं दुकान सुरूय. त्यामुळं दारुडे दारू पिऊन धिंगाणा घालतात त्याचप्रमाणं दारू पिऊन येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेड दारुडे काढतात.
अनेक वेळा तक्रार देऊन देखील पोलिसांनी किंवा राज्य उत्पादक शुल्क विभागानं कारवाई केली नाही… त्यामुळं संतप्त नागरिकांनी आज या देशी दारूच्या दुकानात घुसून दारू पिणाऱ्या दारूड्यांना चोप देत दुकानाची तोडफोड केली. विशेष म्हणजे या आधी स्थानिक नागरिकांनी दोनदा या दुकानात तोडफोड केली होती. मात्र दुकान चालक त्यांनाच धमकी देऊन सर्रास आपलं दुकान चालवत होता.
विशेष म्हणजे दारूचं हे दुकान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच आहे. खासदार खैरेंच्या मध्यस्तीनंतर देखील हे दुकान बंद होऊ शकलं नाही. मुख्य बाजारपेठ असलेल्या मछली खडक भागात राहणाऱ्या अनेक महिला सणासुदीच्या काळात छोटे व्यावसाय करतात.
काल रस्त्यानं जाणाऱ्या महिलांची छेड दारुड्यांनी काढली. त्यानंतर आज महिलांसह अनेकांनी या दुकानात तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सिटी चौक पोलीस करत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Monday, October 28, 2013, 14:16