तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई -अजित पवार

Last Updated: Monday, January 27, 2014, 19:12

मनसेनं सुरू केलेल्या टोल विरोधातल्या आंदोलनावर आता सरकारनं कारवाईचे संकेत दिले आहेत. टोलची तोडफोड करून कायदा हातात घेणा-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

मनसेकडून डोंबिवलीतील टोल नाक्याची तोडफोड

Last Updated: Thursday, January 16, 2014, 12:50

डोंबिवलीच्या काटई टोलनाक्यावर मनसेनं टोल बंद करण्याच्या मागणीसाठी तोडफोड केलीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केबिनची तोडफोड केलीय. तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.

ठाण्यात कुत्र्याला धडक दिल्यानं स्कूलबसची तोडफोड

Last Updated: Monday, January 13, 2014, 14:22

ठाण्यातले माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे यांच्या पाळीव कुत्र्याला स्कूलबसची धडक लागली. त्यात तो कुत्रा जखमी झाला. त्यामुळं संतापलेल्या फडतरेंच्या कार्यकर्त्यांनी रॅम्बो स्कूलच्या दोन बसेस फोडल्या.

खासदारांच्या कार्यालयाजवळील दारू अड्डा उद्ध्वस्थ

Last Updated: Monday, October 28, 2013, 14:32

औरंगाबादमध्ये मछली खडक भागात संतप्त नागरिकांनी दारु अड्डा उद्ध्वस्थ केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मछली खडक भागात हे देशी दारूचं दुकान सुरूय. त्यामुळं दारुडे दारू पिऊन धिंगाणा घालतात त्याचप्रमाणं दारू पिऊन येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेड दारुडे काढतात.

फिल्मालय स्टुडियोमध्ये तोडफोड, राज कुंद्राचं होतं शूटिंग

Last Updated: Sunday, October 27, 2013, 08:21

अंधेरीतील फिल्मालय स्टुडियोमध्ये तोडफोडीची घटना घडलीय. फिल्मायर स्टुडियोमध्ये राज कुंद्रा यांच्या ‘सुपर फाईट लीग’चं शूटिंग सुरू असताना ही तोडफोड करण्यात आली.

परप्रांतीयांना कंत्राट; मनसेची तोडफोड

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 14:15

नागपूर महानगर पालिकेद्वारा संचालित ‘ऑरेंज सिटी वॉटर कंपनी’नं स्थानिकांना डावलून परप्रांतियांना कामाचं कंत्राट दिल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयात तोडफोड केली.

ठाणे बंद विरोधात मनसेनी केली तोडफोड

Last Updated: Thursday, April 18, 2013, 16:29

ठाणे बंदला हिंसक वळण लागल्यामुळे बहुतांश टीएमटी बसेस रस्त्यावर न उतरल्यानं वागळे आगारात मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

गटवादात हॉस्पिटलची तोडफोड; कारवाई होणार?

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 09:10

ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दोन गटाच्या हाणामारीत हॉस्पिटलचीच तोडफोड केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलंय.

'चर्चगेट'वर उसळला संतापाचा ‘लाव्हा’

Last Updated: Friday, July 20, 2012, 20:38

मोटरमेननं अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’ झाले... पश्चिम रेल्वे प्रवाशांचा उद्रेक चर्चगेट स्टेशनवर पाहायला मिळाला. कित्येक तास खोळंबलेल्या प्रवाशांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर तोडफोड केली.

तोडफोड, दरोडो... भय इथले संपत नाही...

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 21:00

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला... पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात आज पहाटे ३ ते पाचच्या दरम्यान सुमारे ४० चार चाकी गाड्यांची अज्ञात इसमांनी तोडफोड केली.

भाजपचा राडा, तोडफोड... पोलिसांचा लाठीहल्ला

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 18:43

नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. WCL कंपनीच्या कार्यालयाच्या या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या आहेत. भाजप WCLच्या विरोधात आहे. चंद्रपुरात खाणी असलेल्या गावांमध्ये WCLनं विकासासाठी पैसे देण्याची गरज आहे.

सांगलीत शिवसेनेचा राडा

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 21:08

सांगलीतल्या माहेर हॉस्पिटलची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. राज्यात सध्या स्त्री-भ्रूणहत्येची प्रकरणं चांगलीच गाजत आहे.

मनसेचा टोल हल्ला, भुजबळांवर गुन्हा

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 17:48

पुण्यातल्या शिरूरजवळच्या टोलनाक्यावरील टोल वसुलीविरोधात कोर्टात दाखल झालेल्या प्रकरणी कोर्टाच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनतर राज्यभर मनसेच्या रडारावर टोल नाके आलेत. ठिकठिकाणी टोल नाक्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

राज यांचा आदेश.. 'टोलनाका फोडून दाखवला'

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 18:23

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज टोलविरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. राज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केली आहे.

ठाण्यात महिलेचा मृत्यू, हॉस्पिटलची तोडफोड

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 16:42

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या वर्तक नगर भागात माहेर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला.

सीमाप्रश्न पेटला, सिंधुदुर्गात बसची तोडफोड

Last Updated: Sunday, May 20, 2012, 12:06

बेळगावमध्ये आज सीमावासियांचा मेळावा होतो आहे. सीमावासियांच्या या मेळाव्याला परवानगी दिल्याने कन्नडीयांनी याला विरोध केला आहे. सीमावासियांचा आजचा मेळावा उधळून लावण्याचं षडयंत्र कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी आखल्याचं बोललं जातं आहे.

शिक्षकांनीच केली शाळेची तोडफोड

Last Updated: Saturday, May 19, 2012, 23:44

नोकरीच्या आशेने आलेल्या ५००च्या वर उमेदवारांनी केली मुलाखतीच्या ठिकाणी तोडफोड केली. कल्याणमधील कर्णिक रोड परिसरात ही घटना घडली. वृत्तपत्रातली नोकरी संदर्भातील जाहिरात पाहून मुलाखतीसाठी ५५० च्या वर तरुण आले होते.

कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल- आमदार

Last Updated: Monday, April 30, 2012, 20:15

'झी २४ तास'शी बोलताना आमदार संजय पाटील यांनी जनतेची माफी मागितली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याच्या केलेल्या तोडफोडीबाबत त्यांनी माफी मागितली. तसचं संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई देखील केली जाईल

कार्यकर्त्यांचा राडा, टोलनाका फोडला

Last Updated: Monday, April 30, 2012, 17:44

दुपारी खेड-शिवापूर टोलनाक्यावर हल्ला करून तो फोडण्यात आला आहे. टोल नाक्यावरील केबिन पूर्णपणे तोडण्यात आल्या आहेत. तर त्याच बरोबर तेथील संपूर्ण सामानाची देखील तोडफोड करण्यात आली आहे.

वाहनांची तोडफोड, पोलीस मात्र अपयशी

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 09:49

नाशिकच्या विनय़नगर भागात अज्ञात समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकमधील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र पुन्हा वाहनांची तोडफोड सुरु करुन समाजकंटकांनी पोलिसांसमोर पुन्हा आव्हान निर्माण केलं आहे.

राज्यातील रक्तरंजीत राडे

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 12:45

राज्यात महापालिका निवडणुकांनंतर आता रक्तरंजीत राजकीय राड्याला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि नागपुरात राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्या आहेत तर पुणे आणि नाशकातही तोडफोड करण्यात आली आहे.

निम्हणांच्या समर्थकांची ‘गिरीं’वर दादागिरी

Last Updated: Monday, January 2, 2012, 20:54

पुण्यात आमदार विनायक निम्हणांची आंदोलक अधिका-यांविरोधात दादागिरी सुरू आहे. आधी तहसीलदारास धमकी देणाऱ्या निम्हणांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आहे. आमदार विनायक निम्हण यांच्यावर पुण्यातील तहसिलदार सचिन गिरी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

आरपीआयचा 'राडा', इंदू मिलवर फिरवणार 'गाडा'

Last Updated: Thursday, December 15, 2011, 11:28

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादरमधल्या इंदूमिलची केवळ ४ एकर जागा देण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविरोधात आज रिपब्लिकन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची तोडफोड

Last Updated: Sunday, December 4, 2011, 05:56

नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची आणि ७ ते ८ टेम्पो फोडल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री आयोळे परिसरात ही घटना घडली. अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही तोडफोड केली.