बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे– सुभाष देसाई, Bal Thackeray in nature to improve - Subhash Desai

बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे – सुभाष देसाई

बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे – सुभाष देसाई
www.24taas.com, मुंबई

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहेत. त्यांच्या प्रार्थनेमुळे बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असी माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज मीडियाला दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. याचदरम्यान, पुतणे राज ठाकरे यांनी चागंली बातमी दिली, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर सुभाष देसाई यांनी दिलासा देणारे अधिकृत दिले. बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे. शिवसैनिकांच्या प्रार्थनेला यश आले आहे. ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे अधिक माहिती थोड्याच वेळात देतील, असे शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे सांगितले होते. मात्र, सुभाष देसाई यांनी यांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्याने शिवसैनिकांसाठी दिलासादायक वृत्त मिळाले आहे. जनतेच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेला यश आल्याचे देसाई यांनी सांगितले.

बाळासाहेब यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांची इच्छाशक्तीही प्रबळ असल्याने ते यातून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास सकाळी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे व्यक्त केला होता.

सकाळी १०.०० वाजता शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली होती. बाळासाहेब डॉक्टरांच्या उपचाराला चांगला प्रतिसाद देतायत असे सकाळी `झी २४ तास`ला सांगितले होते.

First Published: Thursday, November 15, 2012, 16:06


comments powered by Disqus