`फेसबुकवर पोस्ट करणार नाही, दोघी घाबरल्या`

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 14:40

सोशल नेटवर्किंग साइटवर आता यापुढे पोस्ट करणार नाही, असे सांगून जी फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल मी माफी मागत असल्याचे तिने सांगितले. या घटनेनंतर या दोघी खूप घाबरल्याचे पत्रकारांना माहिती देताना दिसून आले.

सातासमुद्रपार बाळासाहेब...

Last Updated: Monday, November 19, 2012, 18:40

बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता. बाळासाहेबांच्या निधनाची देशभरातील नाही तर जगभरातील मीडियाने दखल घेतली. श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, अमेरिका या देशातील प्रसारमाध्यमांनी बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले.

बाळासाहेबांच्या अस्थीचे मिळणार सैनिकांना दर्शन

Last Updated: Monday, November 19, 2012, 17:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थीकलश राज्यातील जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. याची जबाबदारी संपर्क नेत्यांवर असणार आहे. गावागावांतील शिवसैनिकांना दर्शन घेता यावं यासाठी अस्थीकलश ठेवला जाणार आहे. २३ नोव्हेंबरला अस्थीकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.

बाळासाहेबांचे स्मारक हवे शिवाजी पार्कमध्ये - जोशी

Last Updated: Monday, November 19, 2012, 17:15

शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी शिवसैनिकांकडून इच्छा आहे.

बाळासाहेबांची पाकिस्तानमध्ये दखल

Last Updated: Sunday, November 18, 2012, 01:05

बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाची दखल घेणा-या पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातमीलाही ठळक प्रसिध्दी दिली आहे. भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक असा उल्लेख बाळ ठाकरे यांच्याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्रांनी केला आहे.

ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसी

Last Updated: Sunday, November 18, 2012, 00:43

महाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

बाळासाहेबांची प्रकृती सुधारतेय - बाबासाहेब पुरंदरे

Last Updated: Thursday, November 15, 2012, 21:15

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी आई जगदंबेकडे प्रार्थना केली. जगदंबे तुझाच उदय होवू दे, तुझाच उदय होवू दे. आदरणीय बाळासाहेबांची प्रकृती सुधारतेय. तुम्हा आम्हांच्या या तळमळीचा आपल्याला मिळालेला हा परमेश्वरी प्रतिसाद आहे, हे भेटीनंतर शिवशाहीर यांनी सांगितले.

बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे – सुभाष देसाई

Last Updated: Thursday, November 15, 2012, 16:41

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहेत. त्यांच्या प्रार्थनेमुळे बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असी माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज मीडियाला दिली.

बाळासाहेबांसाठी `मनसे` प्रार्थना

Last Updated: Thursday, November 8, 2012, 12:06

बाळासाहेब यांच्या स्वास्थ्यासाठी शिवसेना नेते आणि शिवसैना कार्यकर्ते देवाला साकडे घालीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यात मागे राहिलेली नाही. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी मनाने शिवसैनिक असलेल्या जुन्या सहका-यांना घेऊन राज्यातील काही देवस्थानांना भेटी दिल्या. यावेळी बाळासाहेबांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली.