Last Updated: Sunday, November 18, 2012, 01:05
www.24taas.com, इस्लामाबाद बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाची दखल घेणा-या पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातमीलाही ठळक प्रसिध्दी दिली आहे. भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक असा उल्लेख बाळ ठाकरे यांच्याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्रांनी केला आहे.
‘डॉन’ या आघाडीच्या पाकिस्तानी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे श्नसनाच्या विकाराने निधन झाल्याचे म्हटले आहे.
भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराच्या राजकरणावर गेल्या दोन दशकाहून अधिक काळ ठाकरे यांचे वर्चस्व राहिल्याचे डॉनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या अनेक टप्यांवर बदललेल्या भूमिकेचा मागोवाही डॉनने घेतला आहे.
ठाकरे सार्वजनिक आयुष्य भूमिपुत्र मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी वेचले. मुंबईवर आणि मुंबईतील नोक-यांवर मराठी माणसाचा पहिला हक्क तसेच त्यांच्या हिंदुत्वाबद्दलचे विचारही या वृत्तात मांडण्यात आले आहेत.
First Published: Sunday, November 18, 2012, 01:05