बाळासाहेबांचे समाधीस्थळ मध्यरात्रीच हटवलं, Balasaheb memorial move from shivaji park

बाळासाहेबांचे समाधीस्थळ मध्यरात्रीच हटवलं

बाळासाहेबांचे समाधीस्थळ मध्यरात्रीच हटवलं
www.24taas.com, दिनेश दुखंडे, मुंबई

शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं समाधीस्थळ शिवसैनिकांनी हलवलं.. विधीवत पूजा करुन शिवसैनिकांनी हे समाधीस्थळ हलवत बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा पूर्ववत केली... समाधीस्थळ हलवण्याची ही प्रक्रिया शांतपणे पार पडली..

यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.. मात्र शिवसैनिकांनीही संयमाची भूमिका घेत समाधीस्थळ हलवलं.. दरम्यान नवीन समाधीस्थळाबाबत आज चर्चा होणार आहे.. दुपारी १ वाजता मनपा गटनेत्यांच्या बैठकीत नव्या समाधीस्थळाबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे..

या बैठकीत काय निर्णय होतो याकडं आता सा-याचं लक्ष लागलंय... शिवाजी पार्कमध्ये रात्रभरात अनेक घटना घडल्या. शिवसेनेकडून पूर्ववत बाळासाहेबांचं समाधीस्थळ हलवलं. विधीवत पूजा करुन समाधीस्थळ हटवलं गेलं. शिवसैनिकांनी अंशत: विरोध केला. मात्र पोलिसांनी ही संयमाची भूमिका घेत समाधीस्थळ हटविताना काहीही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली. मात्र आता सध्या तरी शिवाजीपार्कात तणावपूर्ण शांतता आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ झालेली आहे.

First Published: Tuesday, December 18, 2012, 07:49


comments powered by Disqus