Last Updated: Tuesday, October 1, 2013, 13:24
दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर नाशकात अंत्यत शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीचं रुप पालटवणाऱ्या या अवलियाच्या जाण्यानं आज गोदाकाठही हळहळला. राजीव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघी मराठी चित्रपटसृष्टी उपस्थित होती. शिवाय नाशिकचे महापौर यतिन वाघ, खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.