चौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह, balasaheb thackeray ,shivaji park

चौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

चौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
www.24taas.com, मुंबई

बाळासाहेब ठाकरेंवर अत्यसंस्कार झाले त्या ठिकाणचा चौथरा हटणार की नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालय. चौथरा हटवण्यापूर्वी शिवसेनेनं पर्यायी जागांचे तीन पर्याय दिले असून यापैकी एका जागेची कायदेशीर हमी महापालिकेकडून मागतलीय.

गेल्या दोन दिवसात शिवसेना नेत्यांच्या महापालिका आयुक्तांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकीत शिवसेनेनं आपली मागणी आयुक्तांपुढे मांडली मात्र त्यावर शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आज बाळासाहेबांच्या महानिर्वाणाला एक महिना पूर्ण होतोय.

या पार्श्वभूमीवर हिंदू प्रथा परंपरेनुसार विधिवत शिवाजी पार्कातील अंत्यंसंस्काराचा चौथरा दूर करण्याचं लेखी आश्वासन महापौर सुनील प्रभू आणि खासदार संजय राऊत यांनी महापालिका आणि राज्य सरकारला दिलय. मात्र अद्याप त्याबाबतीत शिवसेनेकडून कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नाहीये.

दरम्यान शिवसेनेनं चौथ-याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळला जाईल असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलयं.

First Published: Monday, December 17, 2012, 14:37


comments powered by Disqus