Last Updated: Monday, December 17, 2012, 10:28
www.24taas.com, मुंबईबाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा अखेर हलवण्यात येणार आहे. शिवसेना स्वतःच हे बांधकाम काढणार असल्यानं गेले दोन-तीन आठवडे सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार आहे.
आज समाधीस्थळी विधिवत पूजा होणार आहे. त्यानंतर हा चौथरा हलवला जाईल. उद्धव ठाकरे आणि कुटुंबिय यावेळी उपस्थित असतील. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या चौथऱ्याचा वाद अखेर संपुष्टात येणार आहे.
शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुखांची अंत्यसंस्काराची जागा पूर्ववत करण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवरील चौथरा विधिवत दूर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिलीय. आज (१७ डिसेंबरला) शिवसेनाप्रमुखांच्या निधनाला एक महिना पूर्ण होतोय, त्याचदिवशी हा हिंदू प्रथा-परंपरेप्रमाणे चौथरा दूर करण्यात येईल, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय.
First Published: Monday, December 17, 2012, 10:26