Last Updated: Monday, September 10, 2012, 20:27
www.24taas.com, मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे माझ्यातील व्यंगचित्रकाराचा वारसा पुढे चालविणार असल्याचे मत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
गेल्या ४ दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची सामनामध्ये दिर्घ मुलाखत सुरु आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीच्या चवथ्या भागात बाळासाहेबांनी आपले मत व्यक्त केले.
व्यंगचित्रकाराची तुमची भूमिका कोण पुढे नेऊ शकते? याबाबत विचारले असता बाळासाहेब म्हणाले, ``वारसा कोण पुढे नेऊ शकतो, याबाबत मला वाटतेय माझा हा वारसा राजा पुढे नेऊ शकतो. बाळासाहेब राज ठाकरेंना राजा म्हणतात. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि लालकृष्ण अडवानी यांचे चेहरे व्यंगचित्र काढण्यासाठी एकदम योग्य आहेत, असेही त्यांनी यावेळी आपल्या खास शैलीत सांगितले.
छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व्यंगचित्रांवर एक पुस्तक तयार करत असल्याची माहिती बाळासाहेबांनी यावेळी दिली.
First Published: Monday, September 10, 2012, 20:27