‘शर्ट इन’ केलेले पवार... राज ठाकरेंच्या कुंचल्यातून!

Last Updated: Monday, October 21, 2013, 21:17

राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले आणि उपस्थितांना प्रथमच इन शर्ट केलेले पवार यानिमित्तानं पाहायला मिळाले.

असीमला अवाजवी महत्व नको- उद्धव ठाकरे

Last Updated: Thursday, September 13, 2012, 23:17

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी अवाजवी महत्व दिलं जात आहे.त्यांनी देशद्रोहाचा सारखा गंभीर गुन्हा केलेला नाही. पण व्यंगचित्रकारान व्यंगचित्र काढताना मर्यादा बाळगायला हवी, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना कार्याध्यक्षांनी घेतली आहे.

असीमला शिवसेनाप्रमुखांचाही पाठिंबा; आज होणार सुटका

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 12:31

‘राजद्रोह कशास म्हणावं हे सरकारला कळत नसतांना नसती उठाठेव कशासाठी?’ असा सवालही बाळासाहेबांनी केलाय.

असीम त्रिवेदींना जामीन मंजूर

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 19:20

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना अखेर जामीन मंजूर केलाय. त्रिवेंदीनी जामीन नाकारला असला, तरी त्यांना जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावंतर सुनावणीवेळी हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. ५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे.

`असीमला सोडा नाहीतर ठिय्या आंदोलन`

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 14:27

अटकेत असलेले व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींविरोधातला देशद्रोहाचा खटला मागे घेतला नाही तर शनिवारपासून आर्थर रोड जेलमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिलाय.

‘कार्टुनिस्ट त्रिवेदी देशद्रोही नाहीत तर देशप्रेमी’

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 08:54

वादग्रस्त कार्टूनप्रकरणी अटकेत असलेल्या व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

राज ठाकरे वारसा पुढे नेईल- बाळासाहेब

Last Updated: Monday, September 10, 2012, 20:27

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे माझ्यातील व्यंगचित्रकाराचा वारसा पुढे चालविणार असल्याचे मत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना अटक

Last Updated: Sunday, September 9, 2012, 21:18

मुंबईत व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांना अटक करण्यात आलीय. भारतीय राजमुद्रेसंदर्भात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात बीकेसी पोलिसांनी असीम त्रिवेदीला अटक केलीय.

सरकार झुकलं, कार्टूनचं पुस्तक मागे घेणार

Last Updated: Monday, May 14, 2012, 13:26

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वादग्रस्त कार्टूनचं संपूर्ण पुस्तक मागं घेणार अशी घोषणा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केली आहे. या पुस्तकावरुन विरोधकांनी लोकसभेत आज पुन्हा गदारोळ घातला.

कार्टून वादात आंबेडकरांचा संयम, आठवलेंची उडी

Last Updated: Saturday, May 12, 2012, 19:17

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्टूनचा वाद चांगलाच चिघळलाय. रामदास आठवले यांनीही या वादात उडी घेतलीय. बाबासाहेबांचे कार्टून हे अपमानकारक असल्याचं सांगत, तेव्हाच हे कार्टून नष्ट करायला हवे होते, असं त्यांनी म्हटलंय.

बाबासाहेबांचे कार्टुनः दोषींवर कारवाई होणार

Last Updated: Friday, May 11, 2012, 17:12

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त कार्टुनचा समावेश असलेल्या सगळ्या पुस्तकांचं वितरण त्वरित थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. तसंच या प्रकरणात दोषी असलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्याचंही आश्वासन सरकारने दिले आहे.

आंबेडकरांच्या कार्टूनवरून संसदेत हंगामा

Last Updated: Friday, May 11, 2012, 15:17

सीबीएसईच्या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त कार्टून हटवण्यात येणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिले आहे. सीबीएसईच्या 11 वीच्या पुस्तकात आंबेडकरांच्या कार्टुनवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला.

बाळासाहेबांना 'कार्टून वॉच' जीवनगौरव

Last Updated: Sunday, April 29, 2012, 12:20

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 'कार्टून वॉच' या व्यंगचित्रकलेला वाहिलेल्या मासिकाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईत मातोश्री या निवासस्थानी आज या पुरस्कारानं शिवसेनाप्रमुखांचा सन्मान करण्यात येणार आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मिकी माऊसला

Last Updated: Friday, November 18, 2011, 06:53

गेली अनेक वर्ष छोट्या दोस्तांच्या हदयावर अधिराज्या गाजवणाऱ्या मिकी माऊसचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसामनिमित्त खुप खुप शुभेच्छा.मिकी माऊसच्या करामतींनी अनेक बाळगोपाळांना अक्षरश: वेडावून सोडले आहे.