Last Updated: Thursday, November 15, 2012, 23:00
www.24taas.com, राळेगणसिद्धी ‘या देशाला बाळासाहेबांची गरज आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतोय’ अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिलीय.
शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. तसंच बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं आज शिवसेनेकडून जाहीर करण्यात येतंय. गेले दोन दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली होती. बाळासाहेबांच्या प्रकृती खालावल्यामुळे मुंबईसह राज्यात चिंतेचे वातावरण आहे. बाळासाहेबांबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बिघडलीय. पण मी देवाकडे त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करणार आहे. कारण, सध्याच्या राजकारणात युवकांची भाषा जर कुणाला समजली असेल तर ते बाळासाहेब आहेत, असं मी मानतो’ या शब्दात अण्णांनी बाळासाहेबांविषयी आपली भावना व्यक्त केलीय.
उल्लेखनीय बाब म्हणजे, लोकपालच्या मुद्यावरून बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंवर जोरदार टीका केली होती. अण्णा म्हणजे परदेशी पैशावर नाचणारे मोर आहेत, अशा शब्दांत बाळासाहेबांनी अण्णांवर टीकेची झोड उठविली होती.
First Published: Thursday, November 15, 2012, 23:00