Last Updated: Sunday, October 28, 2012, 13:20
www.24taas.com, मुंबईहल्ली बऱ्याच घरांमध्ये फिश टॅंक पहायला मिळतात. त्यात वेगवेगळे रंगीबेरंगी मासे पोहत असतात. घरात फिश टँक असण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. घरात मासे असल्यास घरात भांडणं होत नाहीत. ब्लड प्रेशर नॉर्मल राहातं. याचं शास्त्रीय कारण असं की संतापाच्या क्षणीही फिश टँकमधील माशांच्या हलचाली पाहात राहिलं, तर गुंग व्हायला हों. यामुळे आपला राग शांत होतो आणि रक्तदाब व्यवस्थित राहातो. याशिवाय शास्त्रात फिशटँकसंबंधी काही माहिती दिली आहे.
घरातील फिश टँकमध्ये साधारणतः ९ मासे असवेत. यातील एक मासा काळा आसावा तर इतर सोनेरी गोल्डफिश. गोल्डफिश मासा समृद्धी देणारा मानला जातो. जेव्हा फिश टँकमधील गोल्डफिश मरतो, तेव्हा तो घरातील नकारात्मक ऊर्जा, संकटं, दुर्भाग्य आपल्यासोबत घेऊन जातो. बऱ्याचवेळा तर घरातील एखाद्या सदस्यावर आलेला जीवघेणा प्रसंगही या माशासोबत निघून जातो.
फिश टँक ठेवण्यासाठी वास्तूशास्त्रात काही जागा सांगितल्या गेल्या आहेत. त्यनुसार फिशटँक कधीही हॉलमध्ये किंवा स्वयंपाकखोलीत ठेवू नये. तर बेडरूममध्ये ठेवावा. घराच्या मुख्य दाराजवळ कधीही फिशटँक ठेवू नये. यामुळे घरातील पुरूष व्यभिचारी बनण्याची शक्यता असते. घरात माशांचं वास्तव्य असणं नेहमीच चांगलं मानलं जातं. पण जर घरात फिशटँक ठेवायला जागा नसेल, तर भिंतीवर पाण्यातल्या माशांचं चित्र ठेवावं.
First Published: Sunday, October 28, 2012, 13:20