Last Updated: Sunday, January 6, 2013, 17:39
www.24taas.com, मुंबईआजकालच्या दगदगीच्या जीवनात शांत निवांत झोप मिळणं दुरापास्त झालं आहे. डोक्यामधली अनेक टेन्शन्स, ताण-तणाव यामुळे डोक्यामध्ये नाना चिंता असतात आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. गंमत म्हणजे अशा झोपेवर एक गमतीशीर इलाज आहे.
रामायणामध्ये अनेक महिने झोपणारा कुंभकर्ण आपल्याला माहित हे. तो राक्षस म्हणून जरी आपण त्याचा द्वेष करत असलो, तरी निद्रानास जडलेल्या लोकांच्या बाबतीत मात्र तो आजही देवाचं काम करतो. त्यामुळेच, जर झोप येत नसेल, मनात वेगवेगळ्या विचारांचं काहूर माजलं असेल, तर कुंभकर्णाचा धावा करावा.
झोप येत नसेल, तर शरीर ढिलं सोडावं. श्वास मंद करावा आणि `ऊँ कुंभकर्णाय नमः` असा १०८वेळा मंत्र म्हणावा. हा मंत्र पूर्ण होईपर्यंत तुम्हाला गुंगी येऊ लागेल. आणि तुम्हाला शांत झोप लागेल. ही गोष्ट विचित्र वाटेल, मात्र या मंत्राचा झोप येण्यासाठी खूप फायदा होईल.
First Published: Sunday, January 6, 2013, 17:39