Last Updated: Sunday, June 17, 2012, 21:51
www.24taas.com, मुंबई काही शास्त्रांमध्ये धनप्राप्तीचे वेगवेगळे मंत्र आणि तोडगे सांगितले आहेत. यातील काही मंत्र अत्यंत प्रभावशाली आहेत. या मंत्रांनी चमत्कार घडतो. लवकरात लवकर हातात संपत्ती येते. तसंच इतर समस्या दूर होतात.
ताबडतोब धनप्राप्ती व्हावी, यासाठी खालील मंत्र म्हणावा-
ऐं यं रं श्रीं यं फ्रौं क्रीं श्रीं फट् विधी-
प्रत्येक शुक्रवारी साधकाने शुभ काळ पाहून अंघोळ करून स्वच्छ धुतलेलं धोतर नेसावं. याशिवाय अंगावर कुठलंही वस्त्र असू नये. कुठल्याही आसनावर बसू नये. जमिनीवर बसून उत्तरेस तोंड करून समोर मोती शंख स्थापन करावा आणि स्फटिकाच्या माळेने ५१ वेळा वरील मंत्र म्हणावा. लवकरच या मंत्राचा प्रभाव तुम्हाला जाणवू लागेल. आर्थिक समस्या कमी होतील. हा कूट बीज मंत्र आहे. या मंत्राची रचना गुरू मत्स्येंद्रनाथ यांनी केली आहे.
First Published: Sunday, June 17, 2012, 21:51