Last Updated: Tuesday, June 19, 2012, 22:12
www.24taas.com, मुंबई आपलं स्वतःचं घर असावं, प्रॉपर्टी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण त्यासाठी प्रयत्नही करत असतो. तरीही बऱ्याचवेळा या गोष्टी प्राप्त करण्यात यश लाभत नाही. तर इतरांना मात्र सहज बंगला, गाडी मिळवणं जमतं. आपण नशिबाचा भाग असं म्हणून सोडून देतो. पण, ज्योतिषशास्त्रात याची कारणं आणि त्यावरील उपाय आढळतात.
स्वतःची संपत्ती, प्रॉपर्टी निर्माण होण्यासाठी श्रीमंतीचा योग असावा लागतो. जन्म कुंडलीतील चौथ्या भावात जी रास आहे त्या राशीचा स्वामी म्हणजेच चतुर्थेश जर गुरू, चंद्र किंवा शुक्रासारख्या एखाद्या शुभ ग्रहासोबत पहिल्या भावात असेल तर तुम्ही स्वकमाईने घर बांधू शकतात.
जन्म कुंडलीच्या चौथ्या भावात स्थित राशीचा स्वामी आणि कुंडलीच्या पहिल्या भावात स्थित राशीचा स्वामी ग्रह, दोन्ही चौथ्या भावात असतील तर अचानक खूप मोठ्या जमीन जुमल्याचे तुम्ही मालक होऊ शकतात.
First Published: Tuesday, June 19, 2012, 22:12