तल्लख बुद्धी आणि तेज मिळवण्यासाठी... - Marathi News 24taas.com

तल्लख बुद्धी आणि तेज मिळवण्यासाठी...

www.24taas.com, मुंबई
 
लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक दिव्य चमत्कार घडू शकतात. सतेज आणि तैलबुद्धी प्राप्त करण्याची संधीही श्रावण महिन्यात प्राप्त होते.धर्म शास्त्रांनुसार सप्तमी तिथीला सूर्याची उपासना केली पाहिजे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणा-या सप्तमी तिथीला भगवान शंकर आणि सूर्यदेव यांची संयुक्त पूजा करण्याची प्रथा आहे.
 
या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पित करावे आणि भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा करावी. शिवलिंगावर बिल्व आणि धोतऱ्याची फूल वाहावीत. असे केल्यास  सर्व नकारात्मक शक्ती आफल्यापासून दूर होतात. मनात पवित्र भाव उत्पन्न होतात. रोगांचा नाश होतो. हा विधी रोज केल्यास शक्ती, बुद्धी, वीर्य आणि तेज वाढते.
 
हा विधी करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठावं लागतं. त्यामुळे लवकर उठण्य़ाची सवय लागते. सूर्याची पहिली किरणं अंगावर घेणं नेहमीच शरीरासाठी चांगलं असतं. यामुळे बुद्धीचा विकास होतो.आणि शरीर तेजस्वी होतं.

First Published: Wednesday, July 18, 2012, 18:38


comments powered by Disqus