बाई माझी करंगळी भाग्याची! - Marathi News 24taas.com

बाई माझी करंगळी भाग्याची!

www.24taas.com

आपल्या हाताला असलेली पाच बोटांमध्ये सगळ्यात नाजूक करंगळी ही मोठ्या कमालीची आहे. ज्याला इंग्रजीत फिंगर ऑफ मरक्युरी किंवा लिटील फिंगर म्हणतात. या करंगळीच्या खाली बुध पर्वताचे स्थान आहे, असं मानलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या हाताला असलेल्या इतर सर्व बोटांमध्ये करंगळी सर्वात छोटी असते. पण करंगळी व्यक्तीच्या भविष्य आणि त्याच्या स्वभावाबद्दल सर्वात जास्त माहिती देते.

 
आता आपण जाणू घेऊ या करंगळीची कमाल
 
- जर करंगळी रिंग फिंगरला म्हणजे आपण अंगठी घालतो त्या बोटाच्या पेरे नखापर्यंत पोहचत असली तर ती व्यक्ती जीवनात खूप यश प्राप्त करतं आणि नोकरीतही उच्चपदाला पोहचते.
 
- करंगळीची लांबी जितकी मोठी तितकी ती जास्त शुभ मानण्यात येते.
 
- करंगळी जितकी जास्त लांब तितकी ती जास्त शुभ मानण्यात येते. अशी व्यक्ती यशस्वी प्रशासक होते. जर करंगळीची लांबी रिंग फिंगरच्या वरच्या पेराच्या अर्ध्या भागापेक्षा अधिक पुढे असेल तर ती व्यक्ती आयएएस अधिकारी बनते.
 
- जर हाताला असलेली करंगळीची लांबी असाधारण असेल तर ती व्यक्ती बुद्धिजीवी असते आणि त्यांना दुसऱ्यांना प्रभावित करण्याची विशेष क्षमता असते.
 
- हाताला असलेली करंगळी जर रिंग फिंगरच्या बरोबरीने असेल तर अशी व्यक्ती विशेष प्रतिभावान असते आणि प्रतिभा सामर्थ्याच्या जोरावर ती जगविख्यात होते.
 
- जर करंगळी खूप लहान असते तर अशी व्यक्ती दुसऱ्याचं मर्म अधिक लवकर समजू शकते.
 
 

First Published: Tuesday, January 31, 2012, 17:26


comments powered by Disqus