Last Updated: Wednesday, September 5, 2012, 15:29
www.24taas.com,मुंबईआपल्या घरात सदैव सुख-समृद्धी असावी असं आपल्याला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, असं आपल्याला नेहमी वाटतं. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.
घरामध्ये कुबेराची मूर्ती अथवा फोटो असावा. कुबेर म्हणजे देव देवतांच्या संपत्तीचा रक्षक, खजिनदार. आपल्या घरातील ऐश्वर्य वाढावं .साठी या कुबेराने आपल्या घरात निवास केला पाहिजे. स्वर्गीय कोश सांभाळणाऱ्या कुबेराची मूर्ती अथवा चित्र घरात ठेवल्यास आपल्यावर कुबेराची कृपा होते आणि आपल्या अडचणी, चणचणी दूर होतात.
मात्र, कुबेराची मूर्ती घरात, दुकानात वाटेल तिथे ठेवून चालत नाही. कुबेराची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला असावी. या दिशेला कुबेराची मूर्ती बसवल्यास भाग्य उजळतं. दररोज कामाला सुरवात करण्यापूर्वी या मूर्तीच्या पोटावर हात ठेवून मनातल्या मनात प्रार्थना करा. यामुळे पैशाची आवक वाढते. ऐश्वर्य, संपत्ती यांच्यात वृद्धी होते. घरातील दैन्य- दारिद्र्य दूर होऊन समाधान मिळतं.
First Published: Wednesday, September 5, 2012, 15:29