Last Updated: Wednesday, September 18, 2013, 17:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईहिंदू संस्कृतीनुसार मृत्यूनंतर दहन करताना मुखावर चंदन ठेवून दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. या परंपरेमागे केवळ धार्मिक कारणच नसून शास्त्रीय कारणही आहे.
चंदनाचं लाकूड अत्यंत शीतल मानलं जातं. यामुळेच चंदन उगाळून त्याचा टीळा कपाळावर लावला जातो. शास्त्रानुसार मृत पावलेल्या व्यक्तीच्या मुखावर चंदनाचं लाकूड ठेवल्यासआत्म्याला शांती मिळते. तसंच मृत व्यक्तीला दहनानंतरही शीतलता लाभते.
तसंच मृत व्यक्तीचं जेव्हा दहन केलं जातं, तेव्हा त्याचं मांस आणि हाडं डळून जातात. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते. मात्र चंदनाचं लाकूड त्यासोबत जालल्यास दुर्गंधी अनेक प्रमाणात कमी होते. त्यामुळे अनेकदा चंदनाच्या लाकडांवरही मृतांचं दहन केलं जातं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 18, 2013, 17:35