Last Updated: Wednesday, February 20, 2013, 17:24
www.24taas.com, जयंती वाघधरे, मुंबईद अटॅक्स ऑफ 26/11 हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे... या सिनेमाम्ध्ये नाना पाटेकर यांनी राकेश मारिया यांची भूमिका साकारलीय....मात्र हा फक्त सिनेमा नसून ही भूमिका साकारणं म्हणजे खूपच जबाबदारीचं काम होतं असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं... नाना पाटेकर यांनी आजवर पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका अनेकदा सिल्व्हर स्क्रीनवर साकारली... आणि आता पुन्हा एकदा नाना या भूमिकेत दिसणार आहेत.
राकेश मारिया यांची भूमिका साकारण्यासाठी नाना यांनी राकेश मारिया यांच्या व्यक्तिमत्वातील काही पैलू काळजीपूर्वक लक्षात ठेवले होते. एकूणच आपल्याला जे काही सांगायचंय ते समाजमनापर्यंत पोहचवण्यासाठी सिनेमा हे खूपच प्रभावी माध्यम आहे.
आजवर नानाने आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर अनेक भूमिका संस्मरणीय केल्या आहेत.. त्यामुळे राकेश मारिया यांची भूमिकाही नानाने तितक्याच ताकदीने साकारली असेल यात शंकाच नाही....
First Published: Wednesday, February 20, 2013, 17:13