तरुणाची हत्या : नाना पाटेकरची टीका, कुटुंबीयांना मदत

Last Updated: Saturday, May 3, 2014, 15:10

अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा येथे घडलेल्या दलित तरुणाच्या हत्येबाबत अभिनेता नाना पाटेकर याने संताप व्यक्त केला आहे. जाती धर्मावरून अशा हत्या घडणं हे लांच्छनास्पद असल्याची टीका नाना पाटेकर यांनी केलीय. तर पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत!

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 16:30

अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत राजकारणापासून दूर पळणारा नाना सिस्टिम बदलण्यासाठी अखेर राजकारणात पाऊल टाकतोय. येत्या १ मेला नाना मनसेत प्रवेश करणार आहे.

नानाची चौफेर टोलेबाजी, नेत्यांची मालमत्ता चौपट कशी होते?

Last Updated: Saturday, February 22, 2014, 20:29

सांगलीत अभिनेता नाना पाटेकर याने राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला. नेते निवडून आल्यावर त्यांची मालमत्ता चौपट होते, असल्या नेत्यांना जनतेनं जाब विचारायला हवा, असं नाना म्हणाला. त्यांनी आपल्या नाना-स्टाईलमध्ये मराठी पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.

नाना पाटेकरांचे राजकारणाला ना ना!

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 16:04

अभिनेता नाना पाटेकर उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविण्याची शक्यता असल्याचे वृत्त स्वतः नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले आहे. मला राजकारण झेपणार नाही आणि राजकारण्यांना मी झेपणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी झी मीडियाशी बोलताना दिली.

पक्षांची ऑफर, पण राजकारण नको- नाना

Last Updated: Friday, January 31, 2014, 08:16

औरंगाबादेत पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धघाटनानंतर अभिनेता नाना पाटेकरनं राजकीय पक्षांची आपल्या शैलीत टर्र उडवली..

विक्रम गोखले, नाना पाटेकर,रिमा यांना घडविणाऱ्यांची मुंबईत कार्यशाळा

Last Updated: Saturday, January 11, 2014, 23:55

अनेक दिग्गज कलाकारांना ज्यांनी घडवलं. मराठी रंगभूमीवरचवर ज्यांचं एक वेगळंच स्थान आहे, अशा विजया मेहता खास आपल्या विद्यार्थांसाठी पुन्हा एकदा कार्यशाळा आयोजित करणार आहे.

अन् नाना पाटेकर संतापला....

Last Updated: Monday, December 30, 2013, 18:34

सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे तापट डोक्याचे आहेत हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला ठाऊक आहे. नाना पाटेकर यांना काही पटले नाही तर ते बेधडक बोलण्यात मागे पुढे पाहत नाही. याचा फटका निर्माता फिरोज नाडियादवालाला त्याचा अनुभव आला.

‘मिक्टा-२०१३’- नानानं केलं शरद पवारांचं कौतुक

Last Updated: Monday, September 30, 2013, 10:08

मकाऊमध्ये यंदाचा ‘मिक्टा-२०१३’ पुरस्कार सोहळा रंगतोय. सुमारे तीनशे कलाकार मकाऊमध्ये दाखल झालेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता नाना पाटेकर आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

अरे, मी एकदम ठणठणीत – नाना पाटेकर

Last Updated: Saturday, August 31, 2013, 19:50

काही दिवसांपूर्वी बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यानंतर हॉलीवुडचा सुपरस्टार जॅकी चँगच्या अपघाती मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती. पण या सर्व बातम्या खोट्या होत्या. असाच काहीसा प्रकार घडला अभिनेते नाना पाटेकर यांच्या बाबतीत.

‘टाळी उत्स्फूर्त... मागून मिळत नाही’

Last Updated: Saturday, June 8, 2013, 22:58

‘टाळी ही उत्स्फूर्त असते... ती मागायची नसते… हल्ली मागूनही टाळ्या मिळत नाहीत’ अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘टाळी’ प्रकरणाला टोला लगावलाय.

दादा शब्द जरा जपून वापरा - नाना पाटेकर

Last Updated: Friday, May 3, 2013, 13:50

राज्य सरकारच्या पन्नासाव्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नाना पाटेकरना राज कपूर विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

मी मुंबईत राहत नाही - नाना पाटेकर

Last Updated: Monday, April 29, 2013, 14:18

मी मुंबईत राहत नाही आणि मुंबई हे माझे राहण्याचे ठिकाण नाही, अशी खंत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलीय.

‘बलात्कार करणाऱ्या नराधमांना पब्लिकच्या हवाली करा!’

Last Updated: Sunday, April 21, 2013, 15:31

राजधानी दिल्लीत घडलेला हा प्रकार अतिशय संतापजनक असून या नराधमांना तुरुंगात नको, ‘पब्लिक’च्या हवाली करा, अशा शब्दांत महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील घटनेचा संताप व्यक्त केला आहे.

यापुढे संजय दत्त सोबत काम करणार नाही- नाना

Last Updated: Sunday, April 21, 2013, 07:47

संजय दत्त याच्यावर अभिनेता नाना पाटेकरांनी टीका केली आहे. संजयसोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही, हीच माझ्या परीनं दिलेली शिक्षा असेल, असं नाना म्हणाला.

भाषण करणं अजितचा स्ट्राँग पाईंट नाही - नाना पाटेकर

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 12:25

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची सर्वच स्तरातून निंदा करण्यात येत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील अजित पवारांचे कान टोचले.

फिल्म रिव्ह्यू :`द अटॅक्स ऑफ २६/११`... जिवंत कथा!

Last Updated: Friday, March 1, 2013, 11:42

‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत.

२६/११ पहा काय साकारतोय नाना पाटेकर भूमिका

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 17:24

द अटॅक्स ऑफ 26/11 हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे... या सिनेमाम्ध्ये नाना पाटेकर यांनी राकेश मारिया यांची भूमिका साकारलीय.

अमिताभला नाना पाटेकरच्या अभिनयाची भूरळ

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 17:14

अमिताभने नाना पाटेकर यांच्या अभिनयाची स्तुती केली. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमिताभ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांनी कोहराम नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र आगामी २६/११ या सिनेमातील नाना पाटेकरांचा अभिनय अमिताभ बच्चन यांना विलक्षण भावला आहे.

दुखाचं भांडवल अन् ‘जीवनगौरव’ पुरस्कार!

Last Updated: Thursday, January 3, 2013, 13:56

‘जीवनगौरवाची थेरं बंद करा’ असं म्हणत नानानं चक्क पुरस्काराच्या देवाण-घेवाणीला फैलावर घेतलंय.

दुर्गम भागात राहणं महाकठिण - नाना पाटेकर

Last Updated: Thursday, January 3, 2013, 12:48

‘वजन कमी करायचं असेल तर हेमलकसामध्ये जाऊन राहा...’ असं मिश्किलपणे म्हणत नानानं तरुण-तरुणींना भारतातल्या दुर्गम भागांकडे एकदा पाहण्याचा सल्ला दिलाय.

हातात मेणबत्या नाही, तलवारी घ्या- नाना

Last Updated: Thursday, January 3, 2013, 13:59

अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयाबद्दल जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो आपल्या रोखठोक वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहे. आताही नाना पाटेकर याने चालू घडामोडींबद्दल बोलताना वादळी वक्तव्यं केली आहेत.

सचिनने सन्मानाने निवृत्ती घ्यावी - नाना पाटेकर

Last Updated: Monday, December 17, 2012, 13:03

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांच्या मनात राजा आहे, आणि म्हणून निवृत्ती बद्दल त्यानं स्वत:च विचार करावा असं मत सिने अभिनेता नाना पाटेकर यानं व्यक्त केलय.

'इथंही एक ढोबळे द्या', म्हणतोय नाना

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 13:24

पुण्यातल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ‘इथंही एखादा वसंत ढोबळे द्या’, अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी मुंबईतील एसीपी वसंत ढोबळेंचं कौतूक केलंय.

नाना होणार... 'डॉक्टर प्रकाश बाबा आमटे'

Last Updated: Thursday, July 5, 2012, 08:25

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचं नाव डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असं असून या सिनेमात प्रकाश आमटे यांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर साकारणार आहेत...

नाना पाटेकरचा आचारीही प्रणवदांविरुद्ध लढणार!

Last Updated: Monday, June 25, 2012, 17:07

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर याचा आचारी संतोष सिंह हादेखील राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरला असून ही निवडणूक लढविण्यासाठी त्याने अर्जदेखील भरला आहे.

सचिन एक परिकथा आहे - नाना पाटेकर

Last Updated: Friday, March 16, 2012, 21:04

सचिन निश्चतच आदर्शवत आहे आणि क्रिकेटच्या खेळाडूंसाठी तो कायम आदर्शच राहिल. सचिन एक मिथ आहे, तो दंतकथा बनला आहे. सचिन एक परिकथा बनून राहिला आहे.

नानाने मोडले 'कंबार' यांचे 'कंबरडे'

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 13:04

ज्ञानपीठ विजेते कन्नड साहित्यिक डॉं. चंद्रकांत कंबाट यांनी मराठी भाषेबद्दल द्वेषभावनेने केलेल्या वक्तव्याने त्यांचावर चौफर टीकेचा भडीमार होत आहे. सीमाभागातील मराठी भाषकांचा जन्म केवळ गोंधळ घालण्यासाठीच झाला आहे,

'नानाचा नेम चुकला', आणि 'नाना चुकचुकला'

Last Updated: Saturday, November 19, 2011, 12:15

चित्रपटामध्ये विविध भूमिका साकारणारा नाना पाटेकर पाचव्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झाला होता. नानानं 50 मीटर राफयल प्रोन प्रकारात सहभाग घेतला होता. मात्र, या चॅम्पियनशिपमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

'पुल'कीत नाना

Last Updated: Friday, November 4, 2011, 14:54

पुल देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. ८ नोव्हेंबर ही पुलंची जयंती आणि म्हणूनच गोरेगावकर पुल प्रेमींनी पुलोत्सवाचं आयोजन केलं आहे. या उत्सवाचं उद्धाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

बाळासाहेबांचं माझ्यावर मुलासारखं प्रेम - नाना

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 07:10

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वांत आवडते नेते आहेत. त्यांनी माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम केलं, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शिवसेनाप्रमुखांविषयी आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.